Home / News / राज्यात येत्या ४ दिवसांतपुन्हा पाऊस पडणार

राज्यात येत्या ४ दिवसांतपुन्हा पाऊस पडणार

मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे...

By: E-Paper Navakal

मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.राज्यात २१ ऑगस्टपर्यंत दुपारी किंवा संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, धुळे, जालना अहमदनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, जळगाव, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, नंदूरबारसह अन्य जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या