मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हा इशारा जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला पाऊस पडण्याची शक्यता आहे.दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तरेत पश्चिम चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर मराठवाड्यात २ व ३ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे .दरम्यान उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असून काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची शक्यता
