अहमदनगर – राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. आता राज्यात उन्हाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. येत्या 9 मे 2023 पासून राज्यात उन्हाचा पारा वाढणार आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 9 मे ते 16 मे पर्यंत राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तापमान जवळपास 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेे उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
राज्यात पुढील आठवड्यात उष्णतेचा पारा वाढणार
