मुंबई – फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा संपत नाही तोच राज्यातून पहाटेची थंडी कमी होत आहे. तापमानात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. राज्यातील अनेक भागांतून थंडी गायब झाली असून उकाडा वाढू लागला आहे.राज्याच्या काही भागांत ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.
राज्यात थंडी कमी झाली उकाडा वाढू लागला
