पुणे-राज्यात उन्हाचा चटका वाढत चालला आहे.कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे सरकला आहे.
काल सोमवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे.त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हरियाणाच्या रोहतक भागात सोमवारी देशाच्या सपाट भूभागावर निचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाडमधील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २२ अंशाच्यादरम्यान
राज्याच्या कमाल तपामानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत सोलापूरसहित मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली,परभणी,विदर्भातील ब्रह्मपुरी,अकोला,नागपूर, चंद्रपूर,वर्धा या भागात कमाल तापमान ३६ अंशावर होते.राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. उकाड्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.तापमानातील बदलामुळे लोकांमध्ये आजार बळावण्याची शक्यता आहे.