Home / News / राज्यातील ८७ मतदारसंघात यंदा २ ईव्हीएम मशीन लागणार

राज्यातील ८७ मतदारसंघात यंदा २ ईव्हीएम मशीन लागणार

मुंबई- यंदा काही राजकीय पक्षांची विभागणी झाल्याने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमालीची वाढली आहे. यावेळी राज्यातील २८८ पैकी तब्बल ८७...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- यंदा काही राजकीय पक्षांची विभागणी झाल्याने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमालीची वाढली आहे. यावेळी राज्यातील २८८ पैकी तब्बल ८७ मतदारसंघात दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे.राज्यात सर्वांत जास्त ३४ उमेदवार माजलगावमध्ये तर सर्वांत कमी फक्त तीन उमेदवार शहादा मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच बहुजन वंचित आघाडी,
बसपा,रिपाइं आदी विविध राजकीय पक्ष उतरले आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले असल्याने त्यांचे उमेदवार वाढले आहेत. तसेच यंदा बंडखोरीही जास्त प्रमाणात दिसत आहेत.यंदा १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास त्या मतदारसंघात दोन ईव्हीएम लावावी लागणार आहेत.
राज्यातील८७ मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार आहेत.मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक उमेदवार २२ हे मानखुर्द-शिवाजीनगर तर सर्वांत कमी ६ उमेदवार हे चेंबूर व माहीममध्ये आहेत

Web Title:
संबंधित बातम्या
Raj Thackeray On Maharashtra Politics: "देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच!"; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा राज्यातील पक्षफोडाफोडीवर घणाघाती हल्ला

Raj Thackeray : लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना पाठीशी का घालताय? देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसत बसतो.. ‘भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय’; अमित साटम प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप….