इचलकरंजी – कोष्टी समाजाचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान धर्मगुरू गायत्री पीठ हम्पी येथील देवांग मठाचे मठाधिपती दयानंदपुरी महास्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व चौंडेश्वरी मंदिरात एकाचवेळी चौंडेश्वरी देवीला अभिषेक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्यावतीने या अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम २४ मे रोजी पार पडणार आहे. राज्यात चौंडेश्वरी देवीची एकूण ६१ मंदिरे आहेत.
महाराष्ट्रातील ६१ मंदिरांमध्ये हा अभिषेक होणार आहे. मंगळवार पेठ, इचलकरंजी येथील देवांग मंदिरांत यादिवशी सकाळी ७ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. सर्व समाजबांधवांनी यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते आणि देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिषेक होणार आहे, असे महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे महासचिव रामचंद्र निमणकर व देवांग समाजाचे खजिनदार संजयदादा कांबळे यांनी सांगितले आहे.