सांगली- कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली होती. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून ते राज्यातील सर्वांत तरुण आमदार ठरले आहेत.ते २५ वर्षांचे आहेत.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांना पहिल्यांदाच उमदेवाही मिळाली होती. अजित पवार गटाने त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण माजी खासदार संजयकाका यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी एक लाख २६ हजार मते मिळवत आघाडी घेतली. संजयकाका पाटील यांना ९९ हजार मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या नावासारखेच तीन इतर उमेदवारही देण्यात आले होते.मात्र,रोहित पाटील यांनी या सर्वांमध्ये बाजी मारली.रोहीत पवार यांचे वय २५ वर्षे असून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.त्यांच्या नावे फक्त ३६ हजारांची रोख रक्कम आहे. तसेच एक लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत.त्यांच्या नावावर ना कोणता बंगला नाही गाडी आहे. रोहित पाटील यांच्याकडे एकून २८ लाख ४२ हजार रुपये मालमत्ता आणि ८६ लाख ८० हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.