राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद पुण्यात

पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा १२ ते १८ अंशांच्या दरम्यान दिसून आला.

हवामान खात्याच्या मते, पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीची तीव्रता वाढत आहे.आज पुण्यात मगारपट्टा, वडगावशेरी आणि चिंचवड या भागांत अनुक्रमे १८.३, १८.२, आणि १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.याशिवाय पुरंदर, इंदापूर आणि नारायणगाव या भागांमध्ये तापमान १३.४, १३.३, आणि १२.९ अंशांच्या दरम्यान राहिले. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातील उच्च दाब क्षेत्र आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून पुढील आठवडाभर किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात बारामती (११.८), आंबेगाव (११.९) या भागांमध्येही थंडीची तीव्रता जाणवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top