मुंबई – राज्यातील सर्व शाळांना यावर्षी दिवाळीची सुट्टी १४ दिवसांची असणार आहे.शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार २८ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे. मात्र १० नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होतील.चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राच्या परीक्षा सध्या सुरु झाल्या असून त्या २७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर २८ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होईल.दरम्यान, इयत्ता दहावीची परीक्षा पुढील वर्षी २१ फेब्रुवारी रोजी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. तत्पूर्वी, २४ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होतील.