राज्यातील वैद्यकीय संस्थासाठीहरियाणा सरकारच्या सूचना

चंदीगढ-कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.राज्यातील सर्व वैदयकीय शिक्षण संस्था, रुग्णालये व इतर आस्थापनांमध्ये सुरक्षेसाठी तातडीने सीसीटीव्ही बसवावेत अशा सूचना सर्व संस्थाना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांना प्रवासासाठी वाहनाची सोय करावी, सर्व मेडिकल कॉलेजांनी जवळचे पोलीस स्थानक, डीएसपींशी थेट संपर्क प्रस्थापित करावा, कॉलेज परिसरातच पोलीस चौकी असावी, चोवीस तास किमान एक तरी महिला पोलिस तैनात असावी, ओपीडी व इतर जागांवर सीसीटीव्ही लावावेत, त्याचप्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्या ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणीही सीसीटीव्ही लावावेत. पार्किंग क्षेत्रात प्रकाश असावा, नियमित गस्त घालण्यात यावी त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरु करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top