परभणी- यापुढे राज्यात आता तीव्र थंडीची लाट पसरणार आहे. येत्या १ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार असून कुठेही पाऊस पडणार नाही, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्हिडीओच्या माध्यमातुन वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी सोशल मीडियावर प्रसारीत केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, राज्यात १८ जानेवारीपासून तीव्र थंडीची लाट येणार आहे. सर्वत्र हवामान कोरडे राहणार असून पुढील १ फेब्रुवारी कुठेही पाऊस पडणार नाही. किमान १५ दिवस तरी पाऊस येणार नाही. या काळात थंडी वाढत राहणार आहे. पाऊस पडणार नसल्याने द्राक्ष, मिरची आणि अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्यांना हा दिलासादायक काळ असणार आहे. १९ जानेवारीपासून थंडीचा जोर वाढत जाणार असून त्याची तीव्रता १ फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे.
राज्यातील थंडी वाढणार हवामान कोरडे राहणार !
