राज्यातील तब्बल ३०८ गृहनिर्माण प्रकल्प दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

  • वासा,निर्मलचा समावेश
  • घर घेताना खात्री करा!

पुणे – सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न असते.त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमा करतो आणि आपले एक छोटे घर बुक करतो.परंतु सध्या विविध कारणांनी अनेक बिल्डरांचे प्रकल्प दिवाळखोरीकडे जात आहेत.त्यातील काही प्रकल्प बंद झाले आहे तर काही सुरु आहेत.दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या प्रकल्पांची संख्या ३०८ आहे.त्यामध्ये लवासा,निर्मल लाइफस्टाइल,नेपच्यून डेव्हलपर्स कॉर्पोरेशन आणि लोखंडवाला-कटारिया यासारख्या दिग्गज गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे,अशी माहिती महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने देत घर खरेदी करण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे.यात मुंबईतील सर्वाधिक २३३ प्रकल्प आहेत.पुण्यातील ६३ प्रकल्पांनाही फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये दिवाळखोरी वाढली आहे, त्यापैकी ११५ अद्याप सुरू आहेत आणि १९३ आधीच बंद झाले आहेत. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आणि इतर पतपुरवठादारांनी या ३०८ प्रकल्पांविरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे. मुंबईमध्ये २३३,पुण्यात ६३ आणि अहमदनगरमध्ये पाच, सोलापूरमध्ये चार आणि रत्नागिरी,छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथे प्रत्येकी एक प्रकल्प दिवाळखोरीत आले आहे. बंद पडलेल्या १९३ प्रकल्पांपैकी १५० प्रकल्पांमध्ये ५० टक्के पेक्षा पेक्षा जास्त जणांनी फ्लॅटची बुकींग केली आहे. महारेराकडून सर्व प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी छाननी होते.

दिवाळीखोरीला आलेल्या ३०८ प्रकल्पांपैकी१०० प्रकल्प ठाणे जिल्ह्यात, त्यानंतर ८३ मुंबई उपनगरात आणि ६३ पुणे जिल्ह्यात आहेत.पालघरमध्ये १९ प्रकल्प,रायगड १५, अहमदनगरमध्ये पाच, सोलापूर चार, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूर, आणि सांगली येथील एक एक प्रकल्पाचा समावेश आहे.सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये ठाणे परिसरातील ५०, मुंबई उपनगरातील ३१, मुंबई शहरात १०, पुणे आणि रायगडमधील प्रत्येकी आठ, अहमदनगरमधील पाच, पालघरमधील दोन आणि सोलापूरमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. रखडलेल्या प्रकल्पांची संख्या १९३ असून, पुण्यात ५५, मुंबई उपनगरात ५२, ठाण्यात ५०, पालघरमध्ये १७, रायगडमध्ये सात, मुंबईत पाच आणि सोलापूरमध्ये तीन प्रकल्प आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top