राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – राज्याच्या गृह विभागाकडून आज अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर काहींना पदोन्नती देत बदल्या करण्यात आल्या.

गेल्या अनेक दिवसांपासून वेगेवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून निखील गुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गंभीर आरोप देखील केले होते.

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top