पुणे- गेल्या चार दिवसांपासून तापमानात चढउतार होताना दिसत आहे. पहाटे गारठा तर दिवसा दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. मात्र, आता चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने राज्यभरात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशसह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा सुरु असणारा मारा व पश्चिमी झंझावातामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सकाळी व रात्री थंडी वाढणार असून दुपारी मात्र, ऊन पडणार आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात घट होऊन पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यभरात थंडी परतणार चक्राकार वार्याचा परिणाम
