मुंबई- सध्या तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. राज्यभरात उष्णतेची लाट पसरल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईसह कोकण, विदर्भ परिसरात अलर्ट जारी केला आहे. काल मंगळवारी तर तापमानात मोठी वाढ झाली होती. सध्या मुंबईचे तापमान हे ३६ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
सध्या ईशान्य ते पूर्व पट्ट्यातून वाऱ्यांची दिशा असल्याने तापमानामध्ये वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी तर ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सोमवारसाठी उष्ण आणि आर्द्रतायुक्त वातावरणाचा इशारा दिला होता. मुंबईमध्ये पुढील आठवडाभर ३६ अंशांच्या पलीकडे कमाल तापमान असू शकते, आजही तेवढेच आहे तर पुढील चार दिवस ३७ ते ३८ अंशांदरम्यान तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरात उष्णतेची लाट मुंबईचा पारा ३६ अंशांवर
