राजौरी – जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी नियंत्रण रेषेजवळ आज दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला. त्यानंतर लष्करानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.राजौरी जिल्ह्यातील सीमेजवळच्या फाल गावाजवळ ही घटना घडली. सुंदरबन सेक्टरमध्ये आज लष्कराची काही वाहने गस्तीवर असताना जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. जम्मू काश्मीर च्या सीमेलगतच्या भागात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. सीमेपलिकडून होणारी ही घूसखोरी थांबवण्यासाठी भारत व पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात फ्लॅग बैठकही घेतली होती. आज झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली.
राजौरी भागात दहशतवाद्यांचा लष्कराच्या वाहनावर गोळीबार
