राजू शेट्टींना म्हाडाचे घर १ कोटी २० लाख किंमत

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काल घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना या सोडतीत घर मिळाले आहे. त्यांना पवई येथील मध्यम श्रेणीतील घर मिळणार असून या घराची किंमत १ कोटी २० लाख १३ हजार ३२३ रुपये इतकी आहे.म्हाडाच्या घरासाठी १ लाख १३ हजार जणांनी अर्ज केला होता. यापैकी २०३० अर्जदारांना आपल्या हक्काचे घर मिळाली आहेत. राजू शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्या कोट्यातून ३ जणांना घरे मिळणार होती. मात्र त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे घर निश्चित झाले होते. त्याची औपचारिक घोषणा झाली. हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेला आणि अभिनेता शिव ठाकरेला पवई येथील म्हाडाचे घर मिळाले आहे. या दोघांना मिळालेल्या घरांची किंमत १ कोटी ८० लाख आहे.अभिनेत्री गौतमी देशपांडेला गोरेगावमधील आणि अभिनेता निखिल बनेला कन्नमवारनगर येथील घराची लॅाटरी लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top