जयपूर – राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील साहवा येथील झाडसर गजिया मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील २८ विद्यार्थी जखमी झाले आहेत.चुरु जिल्ह्यातील एक स्कुल बस मुलांना घरी घेऊन येत असतांना हा अपघात झाला. या अपघातात कृष्ण मीणा नावाच्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून यात एका विद्यार्थ्यालाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात बसमधील २८ विद्यार्थी जखमी झाले. २० मुलांना तारानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ५ मुलांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या एका विद्यार्थ्याला जयपूरला दाखल करण्यात आलेले आहे.