जयपूर – राजस्थानच्या हनुमानगडमध्ये आज सकाळी मिग-21 हे लढाऊ विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. बहलोल नगर भागातील एका घरावर हे भारतीय लढाऊ विमान कोसळले. या अपघातात 2 महिलांचा व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने पॅराशूट वापरून सुरक्षित जीव वाचवला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. मिगने सूरतगड येथून उड्डाण केले होते.
हवाई दलाच्या सूरतगड स्थानकावरून मिग-21 या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, टेक ऑफ केल्यानंतर लगेचच या विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. पायलटने याबाबत स्टेशनला माहिती दिली. यानंतर पायलट पॅराशूट वापरून विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, हनुमानगढ येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील एका घरावर हे विमान कोसळले. ज्या घरावर हे विमान कोसळले ते पूर्णपणे जमीनदोस्त झाले.
राजस्थानमध्ये मिग-21 जेट कोसळले 3 ग्रामस्थांचा मृत्यू! पायलट सुरक्षित
