जयपूर- भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान काल सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.या विमानाच्या
पायलटला मात्र अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
बारमेर सेक्टरमधील हवाई दलाच्या तळावरून प्रशिक्षण मोहिमेवर असलेले हे लढाऊ विमान बारमेरमधील उत्तरलाईजवळील एका शेतात कोसळल्यानंतर
विमानाने लगेच पेट घेतला. सुदैवाने यात पायलट व्यतिरिक्त कोणीही नव्हते. बारमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान,आयएएफ मिग-२९ मध्ये एक गंभीर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अपघात झाला .
अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत,असे हवाई दलाने म्हटले आहे.
अपघात झाल्याचे कळताच
बारमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन,एसपी नरेंद्र सिंह मीना आणि इतर जिल्हा प्रशासकीय अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.