राजस्थानच्या बालोतरात भूकंपाचे सौम्य धक्के

जयपूर – राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्याला आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी बालोतरा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बालोतरा शहरात होते व ५ किलोमीटर परिसरात हे धक्के जाणवले. जमिनीला अचानक कंपन जाणवू लागल्याने लोक घाबरुन गेले. सौम्य धक्के असल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top