रांजणीत उसतोड करताना
बिबट्याचे बछडे आढळले

पुणे : रांजणी येथील कारमाळा जवळ धुमाळ वस्तीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यापैकी दोन बछडे मृतावस्थेत होते तर, एक जिवंत होता. ही घटना आज सकाळी आठ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

धुमाळवस्तीत भरत हारकू वाघ यांच्या शेतात शुक्रवारपासून ऊस तोडणीचे काम सुरू होते. आज सकाळीच ऊसतोड कामगार उसतोडणीसाठी शेतात दाखल झाले. उसतोडणीचे काम सुरु झाल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास तीन बिबट बछडे उसतोडणी कामगारांना दिसले. यामुळे एकच घबराट उडाली. स्थानिक शेतकरी रमेश सरदार भोर व निलेश कानसकर यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी वनपाल प्रदीप कासारेे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वन कर्मचारी महेश टेमगिरे यांना घटनेची दखल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Scroll to Top