ठाणे – पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील भास्कर पाटील मार्गाचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले असल्याने बस क्रमांक सी ७०० च्या वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. हा बदल महिनाभर म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.
शहरातील आनंद नगर ते स्वामी विवेकानंद चौक ते ठाणे स्टेशन (पूर्व) कोपरी दरम्यानच्या भास्कर पाटील मार्गाचे काम ठाणे पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आल्याने बस क्रमांक सी ७००चे सध्याचे प्रवर्तन काल मध्यरात्रीपासून येणार्या आणि जाणार्या दिशेने स्वामी विवेकानंद चौक (बारा बंगला) पर्यंत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या बसमार्गावरील सिद्धार्थ नगर,गावदेवी मंदिर, ठाणे स्टेशन (पूर्व) हे थांबे वगळले गेले आहेत. या रस्त्याचे काम २४ ऑगस्ट पर्यंत राहणार असल्याने हा बदलही तोपर्यंत लागू राहणार आहे, असे ठाणे पालिका परिवहन प्रशासनाने कळवले केले आहे.
रस्त्याच्या कामामुळे ठाण्यातील बस वाहतुकीत महिनाभर बदल
