ब्रुसेल्स – जगातील आघाडीची शितपेय कंपनी कोकाकोलाने युरोपच्या बाजारातून आपली उत्पादने परत मागवली आहेत. या उत्पादनांमधील रसायनांची मात्रा निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्याने ही उत्पादने परत मागवण्यात आली आहेत.कोकाकोलाच्या, कोकाकोला, फँटा, स्पार्ईट इत्यादी उत्पादने बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँडमधून या देशांमधून परत घेण्यात आली आहेत. या बरोबरच फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन मधूनही काही उत्पादने परत घेण्यात येणार आहेत. या शितपेयांमध्ये वापरण्यात आलेल्या क्लोरिन टायऑक्साईड मुळे मूत्रपिंडाचे आजार उद्भवण्याचा धोका असतो. या रसायनाची मात्रा अधिक झाल्यामुळे ही उत्पादने परत मागवण्यात आली आहेत.
रसायनांची मात्रा अधिक असल्याने कोकाकोलाने उत्पादने परत मागवली
