सेओल – रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नुकताच झालेला सैनिकी सहकार्य करार जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग यांनी व्यक्त केले होते. त्या आज दक्षिण व उत्तर कोरिया सीमेजवळील गावांना भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.पेन वाँग यावेळी म्हणाल्या की, उत्तर कोरियाने घेतलेल्या अणूचाचण्यांचा निषेध केला पाहिजे. या दोन्ही देशांमध्ये जो सैनिकी सहकार्य करार झाला आहे तो जगाच्या शांततेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली. हा करार केवळ या भागासाठीच नव्हे तर संपूर्ण जगालाही युद्धाच्या खाईत लोटण्यासाठी सक्षम आहे. रशियाची सध्याची वागणूक जगात शांतता राखण्यासाठी पोषक नाही. या करारावर जगातील इतर देशांनी नाराजी व्यक्त करायला हवी.
रशिया कोरिया सैन्य सहकार्य धोकादायक! ऑस्ट्रेलियाला चिंता
