मॉस्को- रशियाच्या पूर्व भागात आज पहाटे ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने रशियातील पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या जवळ असलेल्या श्वेलच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला असून त्यातून ८ किलोमीटर उंचीचे राखेचे फवारे फुटत होते. या भूकंपामुळे रशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्सुनामीचा येण्याचा धोक्याचा इशारा अमेरिकन त्सुनामी इशारा प्रणालीने जारी केला.
रशियात आज सकाळी हा मोठा भूकंप झाला.
या भूकंपाचे केंद्र पूर्वेकडील पेट्रोव्हॅलेबस्क कमचॅटस्की जवळच्या कामचाटका येथील बेटापासून ५५ किलोमीटर दूर होते. हे केंद्र येथील समुद्रात ३० मैल खोलीवर असल्याचे रशिया व अमेरिकच्या भूकंप विभागाने सांगितले. पृथ्वीच्या गर्भातील ७ प्लेटच्या हालचालींमधून हा भूकंप झाला असल्याचे भूकंप विभागाने सांगितले. या भूकंपाबरोबरच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला. त्यातून ज्वाळा व राखेचे लोट उठले. ही राख किनाऱ्याच्या दिशेने वाहात असून ती निर्मनुष्य भागातून जात असल्याने नागरी वस्त्यांना त्याचा धोका जाणवला नाही. त्यामुळे या ज्वालामुखीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.