कीव - रशियाकडून युक्रेनवर सतत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन सरकारने वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे युक्रेनमधील नागरिकांवर काळोखात रहाण्याची पाळी आली आहे.
मंगळवारी युक्रेनने रशियावर २०० हून अधिक ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर ८० हल्ले केले. युक्रेनच्या हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. रशियाच्या हल्ल्यातून लोकांना वाचवण्यासाठी युक्रेनने देशातील वीड खंडीत केली आहे.रशियाच्या हल्ल्यापासून लोकांना वाचवण्यासाठी युक्रेनच्या अनेक शहरातील वीड खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हरमन हलुश्चेन्को यांनी फेसबुकवर लिहिले की, “शत्रू युक्रेनियन लोकांना दहशत देत आहे. म्हणून, युक्रेनियन लोकांनी घरीच राहावे. तसेच, सरकारने जारी केलेल्या सल्ल्याचे पालन करा. ऊर्जा कंपनी युक्रेनर्गोने खार्किव, सुमी, पोल्टावा येथे वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. झापोरिझिया, निप्रोपेट्रोव्हस्क आणि किरोव्होह्राड प्रदेशात नोंदवले गेले आहेत.