अहमदाबाद
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात उडी घेतली असून त्याने सदस्य नोंदणी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. त्याची पत्नी रिवाबा जडेजा भाजपाची आमदार आहे.
भाजपा सदस्यत्वाची नोंदणी मोहिम २ सप्टेंबरपासून सुरू असून आज रिवाबा जडेजाने एक्स हँडलवर नवीन सदस्य म्हणून रवींद्र जडेजाचा फोटो पोस्ट केला. याआधी विधानसभा निवडणुकीत त्याने रिवाबासाठी भाजपाचा प्रचार केला होता. त्याने अनेक रोड शोही केले. जडेजाने यावर्षी जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.