मुंबई- रविवारी १९ जानेवारी रोजी मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना मॅरेथॉनसाठी वेळेवर पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेने यादिवशी २ विशेष लोकल गाड्या चालवण्याचे ठरवले आहे.
या विशेष लोकलपैकी एक लोकल मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणार आहे.ही विशेष लोकल कल्याणहून पहाटे ३ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ४.३० वाजता पोहोचेल. दुसरी विशेष लोकल हार्बर मार्गावर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणार आहे.ही विशेष लोकल पनवेलहून पहाटे ३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ४.३० वाजता पोहोचेल.या दोन्ही विशेष लोकल गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.स्पर्धकांसह सामान्य प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.