Home / News / रमाबाई आंबेडकरनगरचा पुनर्विकास चार वर्षांत होणार !८ हजार कोटी मंजूर !

रमाबाई आंबेडकरनगरचा पुनर्विकास चार वर्षांत होणार !८ हजार कोटी मंजूर !

मुंबई- घाटकोपर पूर्वेला असलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे.कामासाठी ८४९८ कोटी रुपयांचा निधी...

By: E-Paper Navakal

मुंबई- घाटकोपर पूर्वेला असलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे.कामासाठी ८४९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या एका बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली.

हा पुनर्विकास प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पात १७ हजार झोपडीधारकांना आपली हक्काची मोफत घरे इमारतीमध्ये मिळणार आहेत.हा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे.या प्रकल्पामध्ये बगीचे,आरोग्य केंद्रे आणि शैक्षणिक सुविधा देखील असणार आहेत.हा प्रकल्प राबविताना पूर्व मुक्त मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे.यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,माता रमाबाई आंबेडकरनगर प्रकल्प हा शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी उपस्थित होते.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts