मुंबई –
रमझान ईद तसेच बासी ईददिवशी बेस्टतर्फे १६५ जादा बस चालवण्यात येणार आहेत. रमजान ईद शनिवार २२ एप्रिला साजरी केली जाणार आहे. त्यानंतर रविवार २३ एप्रिला बासी ईद साजरी केली जाईल. बासी ईदच्या दिवशी संपूर्ण शहरात, विशेषतः मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेधरी, माहीम, धारावी टॉप हिल इ. भागांत जादा बस चालवल्या जातात.