रत्नागिरी- राज्यातील ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील
१ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ५ पेक्षा कमी पटसंख्या असल्याची गंभीर स्थिती आहे.
खाडीपट्ट्यातील एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या मराठी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत.काही ठिकाणी १ तर काही ठिकाणी २ ते ३ पट असलेल्या शाळा आहेत.आपल्या गावातील शाळा बंद पडू नयेत तसेच मुलांनी दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये, याकरिता स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी कित्येक वेळेस यश येत नसल्याचे काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही जरी डिजिटलकडे होत असली तरी शाळांमधील घटणारी विद्यार्थ्यांची संख्या ही शिक्षण खात्याला अडचणीची ठरत आहे. शून्य पटसंख्या शाळा झाली की, ती शाळा बंद पडत आहे. पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते.