मुंबई – रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड होणार आहे, याबद्दल उत्सुकता होती. आज झालेल्या टाटा समूहाच्या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. . नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते.
रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव सर्वात पुढे होते. ६७ वर्षांचे नोएल टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. तसेच ते टाटा स्टील आणि टायटन या घड्याळ कंपनीचे ते उपाध्यक्षही आहेत. टाटा ट्रस्ट ही टाटांच्या वेगगळ्या १४ ट्रस्टची मुख्य संस्था आहे. या ट्रस्टची मालकी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडे आहे. या दोन्ही ट्रस्टचे बहुतांशी शेअर्स आहेत.
टाटा ट्रस्टकडून त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी एक कार्यकारी समिती नियुक्त केली जाते. ही समिती ट्रस्टच्या सर्व कामकाजाचावर देखरेख करते. आतापर्यंत रतन टाटा या ट्रस्टचे संचालक होते. आता नोएल टाटा यांची त्या पदावर निवड झाली आहे. वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह हे या ट्रस्टचे उपसंचालक होते. तसंच मेहली मिस्त्री हे देखील या ट्रस्टचे सदस्य आहेत.
गेल्यावर्षी तुरुंगात असलेल्या इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले होते. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची मोठी भागिदारी आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे काम पाहतो.
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष
