मुंबई – प्रसिध्द उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचा दानशूरपणा आणि प्राणिप्रेमाचा आणखी एक उदाहरण त्यांच्या मृत्यूपश्चात समोर आले आहे. आपल्या पश्चात हजारो कोटींची संपत्ती रतन टाटा आपल्या वारसांसाठी मागे ठेवून गेले आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रात वारसांची नावे आहेतच त्याचबरोबर टाटा यांनी आपल्या पाळीव श्वान टिटो याच्यासाठीदेखील तरतूद करून ठेवली आहे.रतन टाटा यांची सुमारे दहा हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीचे वाटप कोणाकोणाला आणि किती प्रमाणात करावे हे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले आहे.संपत्तीतील काही हिस्सा टिटोसाठी राखून ठेवला आहे.टिटोची पालनपोषण करण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात यावे,अशी इच्छा रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे.रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या घरी काम करणारा राजन शॉ आणि सुमारे तीस वर्षे सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या सुब्बियाह याच्यासाठीही संपत्तीचा काही हिस्सा ठेवला आहे.
रतन टाटांच्या मृत्यूपत्रात पाळीव श्वानाचेही नाव
