रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याच्या घरी चोरी

चेन्नई – रजनीकांत यांची मुलगी आणि निर्माती ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरातील मौल्यवान दागिने चोरीला गेले आहेत.याप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात ऐश्वर्या यांनी तक्रार दाखल केली आहे. चेन्नईमधल्या घरातून डायमंड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास 3.60 लाख रुपये असून 2019 मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नात तिने वापरले होते.

तक्रारी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या यांनी हे दागिने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवले होते आणि घरकाम करणाऱ्यांना याविषयीची माहिती होती. घरकाम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्या यांनी संशय व्यक्त केला आहे.हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, अनकट डायमंड्स, अँटिक गोल्ड दागिने, नवरत्न सेट, अँटिक अनकट डायमंड आणि गोल्ड, आरम नेकलेस आणि बांगड्या यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात हे दागिने वापरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी दागिने हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Scroll to Top