प्रयागराज- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भूतानचे राजा जिग्मे नामग्याल वांगचूक यांनी आज त्रिवेणी संगमावर स्नान केले. प्रयागराजला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी भूतानच्या राजाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रयागराजला पोहचल्यानंतर त्यांनी गंगा पूजन आणि आरती केली. भूतानच्या राजाने योगींसोबत पक्षांना खायला दिले आणि त्यांचा फोटोही काढला. त्यांनी हनुमान मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर हनुमान मंदिराजवळील महाकुंभ डिजिटल केंद्राला भेट दिली. या ठिकाणी भूतानचे राजा जिग्मे नामग्याल वांगचूक यांनी महाकुंभाचे डिजिटल स्वरूप पाहिले.
योगी आणि भूतानच्या राजाने संगममध्ये स्नान केले
