युबीएस – क्रेडिट स्विस बँकांच्या
विलीनीकरणामुळे नोकरकपात

बर्न: – बँकिंग क्षेत्रातील आलेल्या संकटामुळे स्वित्झर्लंडची क्रेडिट स्विस या बँकेचे युबीएसमध्ये विलीनीकरण होणार आहे. दरम्यान, या विलीनीकरणामुळे आगामी काळात ३६,००० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

१९ मार्च रोजी युबीएसने क्रेडिट स्विस ताब्यात घेतली. यूबीएसने बुधवारी जाहीर केले की ते स्विस बँक क्रेडिट सुईसमधील बँकिंग संकट हाताळण्यासाठी माजी मुख्य कार्यकारी सर्जिओ एर्मोटीला परत आणतील. अहवालानुसार, कंपनी २० ते ३० टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढू शकते. याचा अर्थ २५,००० ते ३६,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यामुळे एकट्या स्वित्झर्लंडमध्ये ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. मात्र, या अंतर्गत कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात होणार याचा उल्लेख अहवालात करण्यात आलेला नाही.विलीनीकरणापूर्वी, युबीएसचे ७२,००० पेक्षा जास्त कर्मचारी होते आणि क्रेडिट स्विस ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी होते. युबीएस – क्रेडिट स्विस या स्वित्झर्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या बँकांपैकी एक आहेत.

Scroll to Top