Home / News / युद्धातून तोडगा निघणे अशक्य! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

युद्धातून तोडगा निघणे अशक्य! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

व्हिएनतान – सध्याचा काळ विस्तारवादाचा नसून युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

व्हिएनतान – सध्याचा काळ विस्तारवादाचा नसून युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज लाओस येथील १९ व्या पूर्व अशियाई शिखर परिषदेत बोलत होते.
या परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, जगातील विविध भागात सुरू असलेल्या संघर्षांचा प्रभाव दक्षिण अशियातील देशांवर पडत आहे. युरेशिया व पश्चिम अशियामध्ये शांतता व स्थैर्य राखले पाहिजे. कोणत्याही समस्येचे निराकरण युद्धाच्या मैदानात होत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रातील स्वतंत्र, सर्वसमावेशक व नियमांच्या चौकटीवर आधारित स्थिती ही प्रगती व शांततेसाठी आवश्यक आहे. समुद्रातील सर्व हालचाली या संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारानुसार केल्या गेल्या पाहिजेत. जलवाहतूक व वायू क्षेत्रातील स्वातंत्र्यासाठी एक निश्चित व प्रभावी आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे. या क्षेत्रातील देशांच्या परराष्ट्र धोरणावर कोणताही अंकुश असता कामा नये.

Web Title:
संबंधित बातम्या