कॅलिफोर्निया- ट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोज्स्की यांचे दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिल्यानंतर वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या निधनाची माहिती वोज्स्की यांचे पती डेनिस ट्रॉपर यांनी आज फेसबुक पोस्टद्वारे दिली.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सुसान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.नऊ वर्षे जबाबदारी सांभाळल्यानंतर वोज्स्की यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये यूट्युबच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, आता माझे कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्प याला प्राधान्य राहील.
वोज्स्की यांच्यानंतर नील मोहन हे गुगलच्या मालकीचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्युबचे सीईओ बनले.मेटाच्या थ्रेड्सवरील एका पोस्टमध्ये मोहन यांनी म्हटले आहे की, १७ वर्षांपूर्वी सुसान जेव्हा डबलक्लिकमध्ये आर्किटेक्ट होत्या, तेव्हा त्यांना भेटण्याचे भाग्य लाभले. त्यांचा वारसा गुगल आणि यूट्युबवरील प्रत्येक गोष्टीला लाभला आहे.