मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी एक घोषणा केली. युक्रेनमध्ये राहून रशियासाठी लढणाऱ्या युक्रेनमधील परदेशी नागरिकांना रशियन नागरिकत्व देण्याचे आश्वासन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले. ‘रशियन नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांची प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रशियन सैन्याशी एक वर्षाचा करार करणाऱ्या परदेशी नागरिकांना रशियन नागरिकत्व दिले जाईल. रशियन सैन्यात सेवा बजावणाऱ्या नागरिकांना निवास परवान्याशिवाय अर्ज करता येईल.’ दरम्यान, पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या हल्ल्यात आपल्या सैन्याची संख्या वाढवण्यासाठी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली. रशियन नॅशनल गार्डची वयोमर्यादा काढून टाकण्यासाठी त्यांनी यापूर्वी आणखी एक करार केला होता.
युक्रेनमध्ये राहून रशियासाठी लढणाऱ्यांना देणार नागरिकत्व
