नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना पहिल्यादा युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमिन झापारोवा आज भारतात दाखल झाल्या. त्याचा हा दौरा 12 एप्रिलपर्यंत असणार आहे. या दौऱ्यात त्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्याशी देश द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. झापारोवा परराष्ट्र आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री यांची भेट घेतील.युक्रेनबरोबर भारताचे सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध आणि बहुआयामी सहकार्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री झापारोवा भारतात दाखल
