तेल अवीव – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात काल हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. आपला नेता मारला गेल्याने हमास आता इस्रायलशी युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवण्याची चर्चा आहे.
गेल्या महिन्यात इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनियेचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेची सुत्रे याह्या सिनवारकडे आली होती. त्याआधी याह्या हमासच्या लष्करी आघाडीचा प्रमुख होता.गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या काही भागांत झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवारच होता.पॅलेस्टिनींच्या हितासाठी इस्रायलच्या विरोधात वाट्टेल त्या थराला जाण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे त्याचा बदला घेणे हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता.
अखेर याह्या सिनवार ठार झाल्यानंतर आता हमास माघार घेत युद्धविरामासाठी राजी होईल,अशी शक्यता वर्तविली जात आहे.
याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता
