मुंबई – मुंबईतील दोन मोठ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा कोट्यावधी रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाला यंदा विक्रमी देणगी मिळाली आहे.
लालबागचा राजा मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले की, यंदा लालबागच्या राजाला ७ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत ५ कोटी ६५ लाख रुपये रोख मिळाले असून ४ किलो दीडशे ग्रॅम सोने प्राप्त झाले आहे. या बरोबरच ६४ किलो ३०० ग्रॅम चांदीचेही दान आले आहे.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या जीएसबी सेवा मंडळालाही मोठ्या प्रमाणात दान आलेले आहे. मंडळाचे अध्यक्ष अमीत पै यांनी सांगितले की, मंडळाला यंदा ११ कोटी ५० लाख रुपये रोख दान आले असून त्या बरोबरच ३० किलो चांदीही प्राप्त झाली आहे.