छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याच्या भीतीचा अंदाज देशातील हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच देशातील तब्बल ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशामध्ये यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने देशभरात मान्सून कमी होण्याच्या शक्यतेने पाच मंत्रालयांचा एक टास्क फोर्स स्थापन करणार असून दुष्काळ पडला तर उपायोजना काय करता येईल, याची चाचपणी सुरू केली आहे. यंदा देशभरात पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक,आंध्र प्रदेश, गुजरात,केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांसह इतर चार केंद्र शासित प्रदेशामध्ये मान्सून गुंगारा देणार असून, पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस खंडित होण्याची शक्यता आहे.