मुंबई- काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारगीत प्रसिद्ध केले असून यंदा पंजा असे त्याचे शब्द आहेत. या गाण्याच्या व्हिडिओत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मोठी दाखवण्यात आली आहे. रोजगारी, संविधानाचे संरक्षण, शाहू फुले आंबेडकरांची विचार, शेतकरी, महिला यांच्या विकासाचा निर्धार काँग्रेसने केला असल्याचे या गाण्यातून सांगण्यात आले आहे. या गाण्यात १० पेक्षा जास्त वेळा नाना पटोले यांची झलक दिसते. त्यामुळे नाना पटोलेंना काँग्रेसच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या गाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.