नांदेड- मकर संक्रांतीचा सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्यामुळे बाजारात तिळ आणि गुळाची विक्री जोमात सुरू झाली आहे.मागील वर्षांप्रमाणे यंदाची तिळ आणि गुळाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. यात तिळाची किंमत २० टक्क्यांनी वधारली आहे.
गेल्या वर्षी तिळाचा भाव १५० ते १६० रुपये किलो इतका होता. हाच भाव यंदाच्या मकरसंक्रांत काळात २० टक्क्यांनी वाढला आहे.सध्या बाजारात तिळ २०० ते २२० रुपये किलो तर गूळ ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. दरवाढ झाली असली तरी विक्रीवर काही परिणाम झाला नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.यंदा तिळाची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने तिळाच्या दरात वाढ झाली आहे.