मुंबई – यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याच्या सुचना मुंबई हायकोर्टाने सरकारला दिल्या.मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, आम्हाला याची कल्पना आहे की, अनेक मंडळांना यासंदर्भात आधीच परवानगी देण्यात आलेली आहे. आता प्रशासनाने संबंधित मंडळांना पीओपीच्या मूर्ती न वापरण्याचे आवाहन करावे. पीओपी मूर्तींवरील बंदीबाबतच्या नियमावलींबाबत सविस्तर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल. या मुद्द्याशी संबंधित सर्वांनी यासंदर्भात ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्रे सादर करावीत.न्यायमूर्ती उपाध्याय यांनी पीओपी मूर्तींच्या वापराबाबतच्या नियमावलींचे पालन केले जात नसल्यावर नाराजी व्यक्त केली. आमच्यासाठी हा मुद्दा फार विचलित करणारा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने २०२०मध्ये यासंदर्भातील नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, त्याचे अद्याप ठोस स्वरूपात पालन केले जात नाही, असे न्यायमूर्ती म्हणाले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |