भाईंदर- गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाला यंदाही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना २७ ऑगस्टला ही दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. आतापर्यंत दहीहंडी दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला ही सुट्टी जाहीर केली जात होती. हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता.मात्र यंदा शासनाने या सार्वजनिक सुट्टीबाबत परिपत्रक काढले आहे.