यंदाही गोव्याच्या धर्तीवर वसईत आज ख्रिसमस कार्निव्हल मिरवणूक

वसई- यंदाही वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला सुरवात झाली आहे.नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी “वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक” उद्या बुधवार २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता निघणार आहे.ही मिरवणुक रमेदीतील घोगळेवाडी येथून प्रस्थान करणार आहे.

उद्या बुधवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता या कार्निवलची घोगळेवाडी, रमेदी येथून सुरुवात होणार असून पुढे होळी मार्गे आक्टन, बंगली, बंगलीहून मधून पापडी नाका गाठून तेथून तामतलाव, पारनाका (वसई ), मिलागरी क्रॉस अणि सायंकाळी ७ वाजता मिरवणूक घोगळे गावात पोहचून तिचा समारोप आहे.नाताळचा हर्ष अणि आनंद देणार्‍या विविध उपक्रमासोबतच जनजागृती, तथा सामाजिक प्रबोधनाचे देखावे आकर्षकरित्या या मिरवणुकीतून पहायला मिळतात.या मिरवणुकीला लाभलेले सर्वधर्मीय स्वरूप आणि स्थानिय संस्कृती, परंपरा यांच्या संवर्धनाची जोड यामुळे ती आणखी वैशिष्ट्यपूर्ण होऊन सर्वच वसईकरांसाठी कुतूहल, तसेच औत्सुक्याचा भाग बनली आहे. वसईचा नाताळ म्हटल्यावर आधी त्याचे अनेकाविध वैशिष्ट्ये सांगितले जायचे. मात्र, आता सर्वात अग्रभागी हा उंट,हत्ती आणि घोड्यांच्या सहभागाने भरवल्या जाणारा,पारंपरिक वेशभूषेत अबालवृद्ध उत्साहाने सहभाग देणारा, तसेच अनेक सामाजिक जनजागृतीचा पुरस्कार करणारा हा कार्निवल उपक्रम वसईत लक्षवेधी ठरत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top